Dhule Talathi Paper 2016 – Marathi

धुळे तलाठी पेपर २०१६ – मराठी विषय

१ खालील शब्दांपैकी लेखनदृष्ट्या अचूक शब्द ………….होय .
(a) अतं:करण (b) अतं:क्करन (c) अंतर्करण (d) आंत : करण
उत्तर – (a) अतं:करण
२ ‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली’. या वाक्यातील क्रियापद ……..आहे.
(a) फुले (b) कोमेजली (c) उन्ह (d) कडक
उत्तर – (b) कोमेजली
३ ‘तो मुलगा चांगला खेळतो.’ या वाक्यात ‘चांगला’ हा शब्द …………..आहे.
(a) क्रियाविशेषण (b) अधिविशेषण (c) गुणविशेषण (d) सार्वनामिक विशेषण
उत्तर – (a) क्रियाविशेषण
४ ‘राजा’ या शब्दासाठी……………..हा समानार्थी शब्द आहे ?
(a) कृप (b) वजीर (c) नृप (d) रवि
उत्तर – (c) नृप
५ ‘अय्या ! किती सुंदर चित्र !’ हे वाक्य……………. आहे.
(a) आज्ञार्थी (b) प्रश्नार्थी (c) विध्यर्थक (d) उद्गारवाचक
उत्तर – (d) उद्गारवाचक
६ ‘शिपाई शूर होता’ या वाक्यातील ‘शूर’ हा शब्द …………….आहे.
(a) सर्वनाम (b) नाम (c) अव्यय (d) विशेषण
उत्तर – (d) विशेषण
७ उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..
(a) भरपूर संपत्ती मिळणे (b) प्रचंड भिती वाटणे (c)आमुलाग्र बदल होणे (d) प्रचंड संताप होणे
उत्तर – (a) भरपूर संपत्ती मिळणे
८ वाक्य म्हणजे ………………
(a) अर्थहीन शब्दसमूह (b) शब्द समूह (c) अर्थवाही शब्दसमूह (d) गुंफलेले शब्द
उत्तर – (c) अर्थवाही शब्दसमूह
९ ‘वाघ्या’ शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
(a) वाघीण (b) वाघ (c) मुरळी (d) वाधी
उत्तर – (c) मुरळी
१० ‘वासरू’ हा शब्द ……….आहे.
(a) नपुसकलिंगी (b) पुल्लिंगी (c)स्त्रीलिंगी (d) उभयलिंगी
उत्तर – (a) नपुसकलिंगी
११ ‘इतिश्री करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
(a) मार देणे (b) शेवट करणे (c) लक्ष न देणे (d) त्याग करणे
उत्तर – (b) शेवट करणे
१२ खालील शब्दांपैकी लेखनदृष्टीने अचूक शब्द ……………….होय .
(a) निघृण (b) निरघून (c) निर्घुण (d) निर्घृण
उत्तर – (d) निर्घृण
१३ नाणी पडण्याची जागा यासाठी समूहदर्शक शब्द …………..आहे.
(a) टाकसाळ (b) नोटप्रेस (c)कारखाना (d) तट
उत्तर – (a) टाकसाळ
१४ भाषा, प्रदेश धर्म यांच्या वेगळेपणाला……………असे म्हणतात.
(a) एकता (b) विविधता (c)विषमता (d) समानता
उत्तर – (b) विविधता
१५ ‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे…………….हे चिन्ह येईल .
(a) उदगारचिन्ह (b) स्वल्पविराम (c) अवतरणचिन्ह (d) प्रश्नचिन्ह
उत्तर – (d) प्रश्नचिन्ह

Leave a Reply

Your email address will not be published.