Nagpur Talathi Paper 2016 – Marathi

नागपूर तलाठी पेपर २०१ ६ – मराठी विषय

१ खालील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थ सांगा. “शिकस्त करणे”
(a) खूप काम करणे (b) मनाप्रमाणे होणे (c) फजिती होणे (d)खूप प्रयत्न करणे
उत्तर – (d)खूप प्रयत्न करणे
२ ‘राजा’ या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
(a) भूपती (b) भूर्ज (c) भूपाल (d) भूप
उत्तर – (b) भूर्ज
३ कर्मणी प्रयोगात कर्म हा …………आहे.
(a) धातू रुपेश (b) संबंधित (c) रूपकात्मक (d) क्रियापद
उत्तर – (a) धातू रुपेश
४ धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द :
(a) खड्ग (b) मृदुगल (c) कोंदड (d) प्रत्यंच
उत्तर – (c) कोंदड
५ जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.
(a) निरक्षर (b)अशिक्षित (c) सेनातानी (d) अंधश्रद्धाळू
उत्तर – (c) सेनातानी
६ विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
(a) विदुषी (b) विधुरीन (c) विधवा (d) सधवा
उत्तर – (c) विधवा
७ “मधु पुस्तक वाचतो” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(a) कर्तरी प्रयोग (b) नवीन कर्तरी प्रयोग (c) भावे प्रयोग (d) कर्मणी प्रयोग
उत्तर – (a) कर्तरी प्रयोग
८ पुढील शब्द समुहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा. ” हरीणासारखे डोळे असणारी “.
(a) मृगनयना (b) मिनाक्षी (c) मृगंगी (d) कमलाक्षी
उत्तर – (a) मृगनयना
९ ‘उमेश’ या शब्दाचा योग्य संधीविग्रह करा.
(a) उमे+श (b) उमा+ईश (c) उम+इश (d) उमाई +श
उत्तर – (b) उमा+ईश
१० “वाहने सावकाश चालवा ” या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.
(a) क्रियाविशेषण (b) विशेषण (c) उभयान्वयी अव्यय (d) क्रियापद
उत्तर – (a) क्रियाविशेषण
११ ‘स्त्रीलिंगी’ शब्द ओळखा.
(a) वरात (b) वित्त (c) वध (d) वैराग्य
उत्तर – (a) वरात
१२ ‘साहस हे जीवनातील मिठासारखे ” आहे या वाक्यातील “साहस” हे आहे.
(a)सामान्य नाम (b) विशेषनाम (c) भाववाचक नाम (d) सर्वनाम
उत्तर – (c) भाववाचक नाम
१३ झाडे या शब्दाचे मुळरूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?
(a) स्त्रीलिंगी (b) पुलिंग (c) नपुसकलिंगी (d) उभयलिंग
उत्तर – (c) नपुसकलिंगी
१४ ……………..प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
(a) केवळ (b) भावे (c) कर्तरी (d) कर्मणी
उत्तर – (c) कर्तरी
१५ ‘शार्दुल’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
(a) सिंह (b) हरीण (c) वाघ (d) हत्ती
उत्तर – (a) सिंह
१६ धैर्य, किर्ती,वात्सल्य ही कोणती नामे आहेत ?
(a) सामान्य नाम (b) विशेष नाम (c) भाववाचक नाम (d) पदार्थवाचक नाम
उत्तर – (c) भाववाचक नाम
१७ खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
“मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो “
(a) केवल वाक्य (b) मिश्र वाक्य(c) संयुक्त वाक्य (d) प्रश्नार्थी वाक्य
उत्तर – (a) केवल वाक्य
१८ द्वंद समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात .
(a) आणि-व-अथवा (b) हो-आहे (c) ते-त्या (d) साठी-होतो-त्यांचे
उत्तर – (a) आणि-व-अथवा
१९ खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
(a) कर्म (b) शुभ्र (c) गर्द्र (d) धर्म
उत्तर – (c) गर्द्र
२० ‘मनस्ताप’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
(a) पूर्वरूप संधि (b) पररूप संधि (c) व्यंजन संधी (d) विसर्ग संधी
उत्तर – (d) विसर्ग संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *