Talathi Ganit Paper 2016 Thane District

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place

१ एका वर्गात ७२ विद्यार्थी असून त्यापैकी १३/२४ मुले असून उर्वरित मुली आहेत, मुलांपैकी १/३ मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर संघट किती जणांना निवडले ?
(a) ७ (b) ९ (c) ११ (d) १३
उत्तर – (d)

२ एका संख्येच्या २/३ च्या ५/६ मध्ये २८ मिळविल्यास तीच संख्या मिळते, तर टी संख्या कोणती ?
(a) ६३ (b) ५६ (c) ७२ (d) १२६
उत्तर – (a)

३ तीन मूळ संख्यांच्या गुणाकार १००१ आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
(a) ११ (b) ५ (c) ७ (d) १३
उत्तर – (c)

४ एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न ६००० रु. आहे . तो घर खर्चासाठी ५०%, औषध पाण्यासाठी १०% शिक्षणासाठी ८% व किरकोळ खर्चासाठी ४२० रु. खर्च करतो व शिल्लक रक्कम बंक्रेत ठेवतो तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो ?
(a) १/५ (b) ३/४ (c) २/५ (d) १/४
उत्तर – (d)

५ 876 X 97=84972 तर 8.4972%÷0.97=?
(a) 87.6 (b) 0.876 (c) 8.76 (d) 0.0876
उत्तर – (c)

६ द.सा.द.शे ०.५ दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये २४ रु. फरक आहे. तर ती रक्कम किती ?
(a) ४८०००० रु (b) ७२०००० रु (c) ९६०००० रु (d) २४०००० रु
उत्तर – (c)

७ १ ते ४५ या संख्या दरम्यानच्या ३ ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किंमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावर संख्या कोणती ?
(a) १८ (b) २१ (c) २४ (d) २७
उत्तर – (d)

८ सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज ४८ वर्षे आहे, तर सुनीताच्या आईचे वय किती ?
(a) २४ वर्षे (b) ३६ वर्षे (c) ३२ वर्षे (d) ४० वर्षे
उत्तर – (b)

९ एक वस्तू ७२० रुपयात विकल्याने विक्रीच्या १/९ तोटा झाला .तर या व्यवहारात तोटा किती झाला ?
(a) शे. १० (b) शे. ९ १/९ (c) शे. ९ (d) शे. २०
उत्तर – (a)

१० (0.36 x 0.7 x 0.08)/(0.6 x 0.42 x 1.6) = ?
(a) 0.2 (b) 0.5 (c) 0.05 (d) 2
उत्तर – (c)

११ कोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय ?
(a) ७००० (b) ७०० (c) ७० (d) ७
उत्तर – (b)

१२ एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?
(a) ६√२ (b) १२ (c) ८√१३ (d) १२√३
उत्तर – (b)

१३ जर EARTH च्या संकेत ३०७८२ असेल, ALPHA चा संकेत ०६५२० व END चा संकेत ३१४ असेल तर PATENT चा संकेत काय असेल ?
(a) ५०८३७८ (b) ५०३८८१ (c) ५०३८७१ (d) ५०८३१८
उत्तर – (d)

१४ एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला २ गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो तेजस्वीनीने १०० पैकी ८० प्रश्न सोडविले तेव्हा तिला 142 गुण मिळाले , तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले ?
(a) ७१ (b) ७२ (c) ६२ (d) ७४
उत्तर – (d)

१५ जर PARAGRAPH = 521231254
JACKET = 627890
PACKAGE = ?
(a) 5227219 (b) 5278239 (c) 4187329 (d) 5223789
उत्तर – (b)

१६ एका टोपलीतील फुलांच्या १२,१५ किंवा १८ यांप्रमाणे फुलांच्या माला केल्यास, प्रत्येकी वेळी ३ फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील ?
(a) १७७ (b) १८३ (c) १८० (d) ९३
उत्तर – (b)

१७ मागील वर्षी एका शाळेत ५०० विद्यार्थी होते, त्यात 320 मुले आणि १८० मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून २८० मुले आणि २२० मुली आहेत तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल ?
(a) मुले ८%घट, मुली १०% वाढ (b) मुले १०%घट, मुली ८% वाढ
(c) मुले १२%घट, मुली १०% वाढ (d) मुले ८%घट, मुली ८% वाढ
उत्तर – (d)

१८ खालीलपैकी किती अंकांना ३ ने नि:शेष भाग जातो .मात्र ९ ने भाग जात नाही ?
2133, 2343, 3474, 4131, 5286, 5340, 6336, 7347, 8115, 9276
(a) ५ (b) ६ (c) ७ (d) यापैकी नाही
उत्तर – (b)

१९ प्रभाकरजवळ २५ पैशांची 64 नाणी व ५० पैशांची काही नाणी आहेत. त्यांच्याजवळ एकूण १०० रुपये असलयास प्रभाकर जवळ एकूण किती नाही आहेत ?
(a) ३३२ (b) २३२ (c) १६८ (d) १०२
उत्तर – (c)

२० २१ व्या शतकाची सुरुवात सोमवार या वराने होत असल्यास, २० व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?
(a) रविवार (b) शनिवार (c) मंगळवार (d) सोमवार
उत्तर – (c)

२१ १ ते ४० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला ५ ने भागल्यास उत्तर काय येईल ?
(a) २० (b) १० (c) ४ (d) ५
उत्तर – (c)

२२ क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने एककेदा हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलन होतील ?
(a) २२ (b) ६६ (c) ६२ (d) ५५
उत्तर – (d)

२३ सिद्धीचा जन्म सोमवारी १५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणता वारी येईल .
(a) बुधवारी (b) मंगळवारी (c) गुरुवारी (d) यापैकी नाही
उत्तर – (a)

२४ ABC चा काटकोन त्रिकोणात M <C =३०º L (AB) =८ से.मी. आहे तर L (BC) = ?
(a) १६ से.मी. (b) ८ से.मी. (c) ८ √२ से.मी. (d) ८ √३ से.मी.
उत्तर – (d)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *