मराठीतील Important म्हणी – Top 50

1 अगं अगं म्हशी मला कोठे नेशी – स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2 आपला हात जगन्नाथ- आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
3 अति तेथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
4 आयत्या बिळात नागोबा- दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
5 आईजीच्या जीवावर बाईजी उदार- दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
6 आपल्याच पोळीवर तूप ओढणे- फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
7 आंधळे दळते कुत्रं पीठ खाते- एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
8 आधी पोटोबा मग विठ्ठोबा- आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
9 अडला हरी गाढवाचे पाय धरी -एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
10 आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे -अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
11 अति शहाणा त्याचा बैल रिकामा- जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
12 आधी शिदोरी मग जेजूरी- आधी भोजन मग देवपूजा
13 असतील शिते तर जमतील भुते- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
14 आचार भ्रष्टी सदा कष्टी- ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
15 आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली- अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
16 आईचा काळ बायकोचा मवाळ- आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
17 आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास- मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
18 आपलेच दात आपलेच ओठ- आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
19 अंथरूण पाहून पाय पसरावे -आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
20 आवळा देऊन कोहळा काढणे- क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
21 आलीया भोगाशी असावे सादर- कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
22 अचाट खाणे मसणात जाणे -खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
23 आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते -अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
24 आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला- ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
25 आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं- स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
26 अळी मिळी गुप चिळी- रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
27 अहो रूपम अहो ध्वनी -एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
28 इच्छा तेथे मार्ग -एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
29 इकडे आड तिकडे विहीर- दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
30 उठता लाथ बसता बुकी- प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
31 उडत्या पाखरची पिसे मोजणे -अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
32 उधारीचे पोते सव्वाहात रिते -उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
33 उंदराला मांजर साक्ष -वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
34 उचलली जीभ लावली टाळ्याला- विचार न करता बोलणे.
35 उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग- प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
36 उथळ पाण्याला खळखळाट फार- थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
37 उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये -कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
38 एक ना घड भारभर चिंध्या- एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
39 एका माळेचे मणी -सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
40 एका हाताने टाळी वाजत नाही- दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
41 ऐकावे जनाचे करावे मनाचे -लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
42 एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत- दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
43 ओळखीचा चोर जीवे न सोडी -ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
44 कर नाही त्याला डर कशाला- ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
45 कामापुरता मामा ताकापुरती आजी- आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
46 काळ आला होता. पण वेळ आली नव्हती -नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
47 कानामगून आली आणि तिखट झाली- मागून येऊन वरचढ होणे.
48 करावे तसे भरावे जसे- कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
49 कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी -कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
50 कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ -आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *